कोकण रेल्वेकडून तब्बल एक महिना मेगा ब्लॉक

Edited by:
Published on: June 28, 2024 07:39 AM
views 1007  views

सिंधुदुर्ग : मे महिन्यानंतर पुन्हा एकदा कोकण रेल्वेकडून तब्बल 30 दिवसांचा म्हणजे एक महिना ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान अनेक लांबपल्ल्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनल येथे यार्ड फिट लाईनच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेकडून एक महिन्याचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कोकण रेल्वेसाठी 30 जून ते 30 जुलै दरम्यान हा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. रेल्वेच्या या मेगा ब्लॉकच्या कामादरम्यान कोकण रेल्वेच्या नेत्रावती, मत्स्यगंधा एक्स्प्रेसचे वेळापत्रक बदल करण्यात आला. या कालावधी या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकापर्यंत असेल, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.