
सावंतवाडी : शक्तीपीठ महामार्गाच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक आयोजित केली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यात येतील. विरोधाला विरोध करणाऱ्यांना, विकासात आडवे येणाऱ्यांना फटके देऊ असा इशारा खासदार नारायण राणेंनी दिला. तसेच आडाळी एमआयडीसीत ५०० प्रकल्प आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. १ लाख रोजगार निर्माण करायचेत. जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री नितेश राणेंनी पुढचं पाऊल टाकलं आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत असल्यानं विकास निश्चित होईल असा विश्वास श्री.राणेंनी व्यक्त केला.
खासदार राणे म्हणाले, विरोधाला विरोध करतात त्यांची गीनती करणार नाही. त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहू. जंगल हे कोणी राखत नाही. ते आपोआप राखलं जात, वन्यजीव ते राखतात. शक्तिपीठ महामार्गाच्याबाबत असलेल्या समस्यांविषयी जिल्हाधिकारी यांच्यासह बैठक आयोजित केली आहे. विकासात आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही. चांगलं काम करणाऱ्यांच कोणी कौतुक करत नाही अस विधान राणेंनी केलं.
दरम्यान, आडाळी एमआयडीसीत प्रकल्प आणण्यासाठी माझी जिंदाल, अदानी गृपसह माझी बैठक आहे. ५०० कारखाने उभारणारा उद्योजक हवा आहे. त्यासाठी जमिन उपलब्ध आहे. मला १ लाख रोजगार निर्माण करायचा आहे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. तर राज, उद्धव ठाकरे एकत्र आले तरी फरक पडत नाही. ते महाराष्ट्राला काय देणार ? उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्गला काय दिलं ? असा सवाल केला. दरम्यान, इको सेन्सिटिव्ह भागात कसा विकास करायचा याची सांगड मी घालेन. इतक्या वर्षात काही केलं नाही त्यांचे विचारू नको. ज्यांनी आपले संसार कासार्डे मायनिंगवर चालवले तेच आज तक्रार करत आहेत. त्यांना कोणी किती पैसे दिले ते मी जाहीर करेन. व्यवसाय नसताना उत्पन्न आलं कुठून ? एकानं आमदार असताना कोल्हापूर येथील ठेकेदारासह काम घेतलीत. ही काम निकृष्ट झालीत. त्यांना सोडणार नाही, केसेस दाखल करणार असा इशारा दिला.
'एआय' प्रणाली वापर करणारा सिंधुदुर्ग पहिला जिल्हा आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी पुढचं पाऊल टाकलं आहे. जिल्ह्याचे नितेश राणे पालकमंत्री, मी खासदार, निलेश आमदार व दीपक केसरकर मार्गदर्शक आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा विकास निश्चित होईल. आज दरडोई उत्पन्न २६० एवढं आहे. येत्या दीड वर्षात ते ३५० एवढं करण्याचा आमचा मानस आहे अस मत व्यक्त केले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, प्रमोद कामत, अँड. परिमल नाईक, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, संतोष राऊळ, राजू बेग, महेश धुरी, मोहीनी मडगावकर, उदय नाईक, गुरूनाथ पेडणेकर, अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, मनोज नाईक, चंद्रकांत जाधव, गुरु मठकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.