वैभववाडी दिव्यांग संघटनेची उद्या बैठक

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 12, 2023 18:06 PM
views 154  views

वैभववाडी : मैत्रेय दिव्यांग संघटना वैभववाडी यांची बैठक उद्या दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आयोजित करण्यात आली आहे. तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 तालुक्यातील दिव्यांग बांधवाच्या  प्रलंबित प्रश्नांसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजनासंदर्भात यावेळी माहीती दिली जाणार आहे. तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन  माहिती अधिकार कार्यकर्ता राजेंद्र कदम व सुनील कांबळे यांनी केले आहे.