गिरणी कामगार - वारसदारांची ४ जानेवारीला बैठक !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 02, 2024 17:14 PM
views 354  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार व वारसदार यांची बैठक येत्या गुरुवार ४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता श्रीधर अपार्टमेंट शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी गिरणी कामगार व वारसदार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष शामसुंदर कुंभार यांनी केले आहे.