
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघटनेची बैठक मंगळवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता काझी शहाबुद्दीन हाॅल (प्रांताधिकारी कार्यालयासमोर) येथे आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर कुंभार, रामचंद्र कोठावळे, सुभाष परब, अभिमन्यू लोंढे यांनी सर्व गिरणी कामगार व वारसांना उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. गिरणी कामगार व वारस यांना म्हाडा लाॅटरीबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच काही अडचणी असतील तर त्यावर चर्चा करून राष्ट्रीय मिल मजदुर संघाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे अध्यक्ष शामसुंदर कुंभार यांनी सांगितले.