
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्या आणि प्रस्तावित वीज दरवाढ याबाबत चर्चा, विचारविनिमय करण्यासाठी कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृहात २८ जानेवारी रोजी दुपारी ३.०० वाजता जिल्हा तथा तालुका कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सचिव दीपक पटेकर आणि प्र. अध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे.