गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कसाल ग्रामपंचायतीमध्ये सभा !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: September 08, 2023 17:50 PM
views 70  views

सिंधुदुर्ग  : सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीतील कसाल ग्रामपंचायतमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. 

या बैठकी दरम्यान आगामी येणा-या गणेशोत्सव सणानिमित्त वाहतूक नियोजनाबाबत उपाययोजना, वाहतूक कोंडीची ठिकाणे व उपाययोजना, गर्दीच्या ठिकाणी घ्यायची खबरदारी, गणेश विसर्जनाच्या ठिकाणी घ्यायची खबरदारी, सायबर क्राईम व कायदे विषयक मार्गदर्शन, दागिन्यांची पाॅलीश करून देण्याबाबत होणारी आर्थिक फसवणूक, दुकानात CCTV कॅमेरा बसवणे, रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घ्यायची दक्षता, तसेच संवाद उपक्रमांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले.  गावातील  फिरणारे फेरीवाले, परप्रांतीय कामगार, भाडेकरू यांची माहिती पोलीस ठाणे येथे कळविणे, गावातील मंदिर सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यायची दक्षता, गावातील होणा-या चोरी घरफोडी यावर चर्चा करून खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

यावेळी  पोऊनि कदम नागरगोजे, श्री नाईक, श्री  नांदोसकर, श्री ओरोसकर, कसाल गावचे पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत मधील कर्मचारी, गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला, व्यापारी, फटाके विक्रते असे 35 ते 40 ग्रामस्थ उपस्थित  होते.