राज्य सरकारला भसम्या झालाय : डॉ. लळीत

Edited by: विनायक गांवस
Published on: July 02, 2025 18:44 PM
views 88  views

शक्तीपीठ महामार्ग विरोधात सभा 

सावंतवाडी : राज्य सरकारला भसम्या रोग झालेला आहे. त्यांच पोट कधीही भरणार नाही. विकासाला आमचा विरोध नाही. पण, पर्यावरणाचा समतोल राखून तो झाला पाहिजे असं मत निसर्ग अभ्यासक डॉ. सतिश लळीत यांनी व्यक्त केले. 

नागपूर ते रत्नागिरी पर्यायी महामार्ग उपलब्ध असताना वेगळ्या मार्गाची आवश्यकता नाही. तो का लादला जात आहे ? हा आमचा सवाल आहे. घाट रस्त्यांवर पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे.

शक्तीपीठ महामार्गा विरोधात आयोजित सावंतवाडी येथील सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, कॉ संपत देसाई, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,  माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा केसरकर, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, प्रसाद पावसकर, रूपेश राऊळ आदी उपस्थित होते.