
देवगड : चैतन्यमय निरोगी सुदृढ आयुष्य जगण्यासाठी या स्पर्धेच्या युगात ध्यानधारणा व ध्यान साधना महत्त्वाची आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्या तेली समाजाचे अध्यक्ष तुकाराम तेली यांनी केले.
सिंधुदुर्ग तेली समाज उन्नती मंडळाची वार्षिक सभा नुकतीच पार पडली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष एकनाथ तेली, आबा तेली, लक्ष्मण तेली, उद्योजक सुरेश नेरूरकर, उपाध्यक्ष परशुराम झगडे, जिल्हा सचिव संजय कवटकर, जि. प. सदस्य सुप्रिया वालावलकर, साक्षी तळवडेकर, कणकवली तालुका अध्यक्ष महेश डिचोलकर, चंद्रकांत तेली, शैलेश डिचोलकर, दत्ताराम हिंदळेकर, दिनकर तेली, शुभांगी तेली, सुशीला नांदोस्कर, बापू तळवडेकर, मधुकर बोर्डवेकर, ॲड. सातार्डेकर आदी उपस्थित होते. यावेळी तेली यांनी उपस्थितांकडून ध्यानधारणा व ध्यान साधना करून घेतली
कार्यक्रमाची प्रस्ताविक तेली समाजाचे सचिव संजय कवटकर यांनी करत व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर देवगड तालुक्यातील हिंदळे येथील दिशा तेली व तिचा भाऊ यांनी सुरेल संबळ वादनासह भवानी माता स्तुती गीत सादर करून उपस्थितांना काव्यानंद दिला.
यावेळी देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दहावी, बारावी, पदवीधर, डॉक्टर झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक विजेती दूर्वा बांदेकर मालवण, जिल्हास्तर अथलेटिक्स स्पर्धेतील रोप्य विजेती निशा तेली, वेटलिफ्टिंग जिल्हास्तरीय स्पर्धेतील ऋषिकेश तेली व जिल्हास्तरीय वाद वीवाद स्पर्धेतील भार्गवी कवटकर यांचा प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तेली समाजातील सन 2025-26 च्या जि.प व पं. समिती निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्य बांधवांचा व राज्यस्तरीय उद्योजक पुरस्कार मिळवलेल्या सुरेशजी नेरुरकर तसेच युवा आंबा शेवगा संशोधक उत्तम फोंडेकर मालवण व युवा उद्योजक कुणाल बिपिन वरस्कर वेंगुर्ले यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी माजी अध्यक्ष एकनाथ तेली यांनी विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी पुरेशी नाही तर स्वत:ल सिध्द करण्यासाठी योग्य धोरण असावे लागते. यावेळी शासकीय सेवेत काम करून निवृत्त झालेल्या बांधवांचा सत्कार करण्यात आला तसेच गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व आजाराने ग्रस्त असलेल्या गरिबांनाही आर्थिक मदत करण्यात आली. कार्यक्रमाची सूत्रसंचालन सहसचिव प्रशांत आजगावकर यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार तेली समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष परशुराम झगडे यांनी मानले.
यावेळी मालवण तालुक्याचे सचिव मंगेश शेरलेकर कणकवली तालुक्याचे सचिव विशाल नेरकर, वेंगुर्ला तालुक्याची अध्यक्ष सुनील नांदोस्कर, सावंतवाडी चे अध्यक्ष श्याम निवेलकर देवगडचे विजय शेट्ये कुडाळचे अध्यक्ष सौ सुप्रिया वालावलकर, उत्कर्ष हॉलचे मालक नंदू आरोलकर, सिद्धिविनायक हॉल कसालचे संतोष कांदळकर पत्रकार महेश तेली ,संजय पेटकर, आनंद सातार्डेकर आधी बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते.










