सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णोपयोगी साहित्य भेट

दक्षता सुर्वे यांचा पुढाकार
Edited by: विनायक गांवस
Published on: April 09, 2025 19:24 PM
views 126  views

सावंतवाडी : अजंठा हॉटेलच्या मालकीण कै. सुहानी मारुती सुर्वे यांच्या स्मरणार्थ त्यांची नात दक्षता सुर्वे कडून हॉस्पिटलला रुग्णोपयोगी साहित्य भेट देण्यात आले. अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दक्षता सुर्वे यांचे मानले आभार.

दक्षता सुर्वे व श्रीईशा सुर्वे यांनी आपल्या आजीच्या स्मरणार्थ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांसाठी रुग्णोपयोगी साहित्य भेट दिल्या. आजारी असताना आपली आजी याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती याची जाणीव ठेवून दक्षता सुर्वे यांनी हा सेवाभावी उपक्रम राबवला. यासाठी त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्याशी संपर्क साधला होता. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सदर साहित्य बादल्या, मग व बेडशीट हॉस्पिटलला रुग्णांसाठी देण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाचे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून कौतुक करण्यात आले.

याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवळे, दक्षता सुर्वे श्री ईशा सुर्वे, अमित मठकर, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम,सिस्टर स्टाफ मध्ये राणे, उबाळे, हेळेकर उपस्थित होते.