नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या विकासकामांचा झंझावात

Edited by: लवू परब
Published on: January 01, 2026 19:42 PM
views 13  views

दोडामार्ग : कसई - दोडामार्ग नगरपंचायतच्या विकास कामांचा झंझावात नगराध्यक्ष चेतन चव्हाण व सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. शहरातील पंचशीलनगर येथील विविध विकास कामांचे गुरुवारी भूमिपूजन करण्यात आले.

कसई - दोडामार्ग नगरपंचायतच्या माध्यमातून शहरात यापूर्वी अनेक विकास कामे करण्यात आली. नगराध्यक्ष चेतन चव्हाण व सर्व भाजप च्या नगरसेवकांनी शहरात अनेक विकास कामे केली. एक वर्षाचां कार्यकाल शिल्लक असताना धडाके बाद विकास कामांना सुरवात करण्यात आली आहे. गुरुवारी पंचशील नगर येथील स्वागत कमानीचे तर मुख्य रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तर जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त  पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग करणे अशा अनेक विकास कामांचे आज भूमी पूजन करण्यात आले. यावेळी नगरध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, नगरसेवक नितीन मणेरीकर, रामराव गावकर, नगरसेविका सौ. ज्योति जाधव, सौ क्रांती जाधव,सौ. वासंती मयेकर, रमाकांत जाधव माजी नगरसेवक सुधीर पनवेलकर,  संकेत गायकवाड मुख्याधिकारी,  अभिषेक नेमाने, शहर स्थापत्य अभियंता प्रबोधन मटकर, निवेद कांबळे स्वच्छता निरीक्षक,  लक्ष्मीकांत पीळणकर, संजय शिरोडकर,  सुभाष केतकर, स्वप्निल सावंत व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.