
कणकवली :भारतातील पहिल्या शिक्षिका , मुख्याध्यापिका आणि स्त्रियांच्या शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाचा पाया रचला. त्या काळात महिलांच्या शिक्षणाला विरोध होत असताना देखील त्यांनी महिलांसाठी शिक्षण शाळा सूरु केली.त्यामुळेच आता महिला सर्वच क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे पुढील काळात आपण सर्वांनीच सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा आत्मसात करूयात, असे प्रतिपादन रामेश्वर विकास सोसायटी चेअरमन,पत्रकार भगवान लोके यांनी केले.
असलदे बौधवाडी येथील पंचशील महिला मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त प्रतिमेस वंदन व ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच, सदस्य ,सोसायटी चेअरमन यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारीत कविता,भाषणांचे सादरीकरण लहान मुले,महिलांनी केले.
यावेळी मुंबई मंडळ अध्यक्ष अनिल तांबे म्हणाले,जगाला आदर्शवत असे सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शैक्षणिक काम उभे केले आहे. महिलांना शिक्षणाची संधी देण्यासाठी मोठा संघर्ष करत महिलांसाठी शिक्षण व्यवस्था उभी केली आहे. त्याचा वारसा जपत आपण अन्यायाविरुद्ध लढल पाहिजे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या घटनेच्या अधिकाऱ्यानुसार आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे.त्यासाठी आपली एकजूट कायम राखली पाहिजे.
यावेळी लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत डामरे,उपसरपंच सचिन परब,सदस्य आनंद तांबे,दयानंद हडकर,सुवर्णा दळवी,सपना डामरे व सोसायटी चेअरमन भगवान लोके यांचा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे आनंद तांबे महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मुंबई मंडळ अध्यक्ष अनिल तांबे,अध्यक्ष आनंद तांबे,सचिव दीपेश तांबे,उपाध्यक्ष पवन तांबे,उपसचिव सुनील तांबे ,खजिनदार मिलिंद तांबे , सचिव मुंबई सुनील गुणाजी तांबे,माजी सरपंच लक्ष्मण लोके,उमेश कुडतरकर,वासुदेव दळवी,सुमेध तांबे, ऍड. प्रशांत तांबे,सुधीन तांबे, विकी तांबे,सिद्धार्थ तांबे,नांदगाव विभाग अध्यक्ष सुनील बेळणेकर , सागर तांबे,श्रीधर तांबे,गौतम तांबे ,शशिकांत तांबे,पंचशील महिला मंडळ अध्यक्ष अंकिता तांबे,सचिव सुनयना तांबे,खजिनदार प्रणाली तांबे, हेमलता तांबे,माजी ग्रामपंचायत सदस्य नीलिमा तांबे, सिंधू तांबे, तांबे, सानिका तांबे,दिपाली तांबे,समीक्षा तांबे,सुनिता तांबे, सुजाता तांबे,भारती तांबे,नंदा तांबे,श्रद्धा तांबे,राखी तांबे,स्वाती तांबे , शीतल तांबे, सिमा तांबे,अनंत तांबे, अनघा तांबे आदी उपस्थित होते.