
वेंगुर्ला : तालुक्यातील मातोंड बांबर क्र. ५ या प्राथमिक शाळेत २० जुलै रोजी गुरूपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई- वडिलांची पूजा करून साष्टांग नमस्कार केला. यावेळी शाळेच्या उपशिक्षिका रेणुका कानसे यांनी गुरू पौर्णिमा उत्सवाचे महत्व आणि इतिहास याची माहिती दिली. मुख्याध्यापक श्री सरमळकर यांनी आई वडिलांचे आपल्या आयुष्यातील स्थान याबाबत मार्गदर्शन केले. सर्व मुलांनी शिक्षकांना फुले अर्पण करून गुरुवंदन केले. यावेळी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवराम सावंत, सदस्य आत्माराम सावंत, स्नेहा परब, निलेश माळकर इतर सर्व पालक वर्ग उपस्थित होते.