राजघराण्याकडून राजश्रींच दर्शन ; जत्रोत्सवास प्रारंभ

Edited by: विनायक गावस
Published on: December 07, 2023 15:05 PM
views 155  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील एकमेव जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजघराण्याच्या स्मशानभूमीतील ‘माठ्याची जत्रेला ‘ गुरुवारी सकाळपासून प्रारंभ झाला.  राजेसाहेब खेमसावंत तिसरे यांच्या माठ्यात सकाळपासून धार्मिक विधी पार पडले. दुपार पासून दर्शनाला सुरुवात झाली आहे.

राजघराण्याकडून राजेसाहेब खेमसावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले यांनी  तिसऱ्या खेमसावंतांच्या माठ्यात नतमस्तक होत दर्शन घेतलं. रात्री या जत्रोत्सवाची सांगता होणार आहे. ही जत्रा दिवसा भरते. संस्थानच्या वीर वंशजांच स्मरण माठ्याच्या जत्रोत्सवात केल जात. सावंतवाडी शहरात होणारा हा एकमेव आणि ऐतिहासिक जत्रोत्सव आहे.