कणकवली विद्यामंदिर विद्यालयाला सावंत फाऊंडेशनकडून विज्ञान प्रयोगांसाठी साहित्य

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 25, 2023 20:45 PM
views 279  views

कणकवली : कळसुली गावातील सावंत डोंगरे सावंत कुटुंबियांच्या मागील पाच पिढ्या समाजसेवा क्षेत्राशी जोडलेल्या आहेत. आपल्या परिसरात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. याचाच एक भाग म्हणून कणकवली विद्या मंदिर हायस्कूल येथे शाळेसाठी विज्ञान साहित्य देण्यात आले. सामाजिक कार्याला एक ठोस पाया असावा व कुटुंबियांच्या जीवनाचा तो अविभाज्य भाग असावा म्हणून सावंत फौंडेशनची स्थापना सन  2002 मध्ये झाली.

कै श्री. पांडुरंग सी सावंत (बाबा डोंगरे) गुरुजी यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि आपल्या कुटुंबा बरोबर इतरही मुलांना घरी आणून किंवा आर्थिक मदत करून शिक्षण दिले. समाजसेवेचा हा कारवा वीस वर्ष असाच पुढे चालत आहे सुरवातीला आम्ही गावातल्या गरीब होतकरू मुलांना कुटुंबाच्या योगदानातून शैक्षणिक मदत दिली. गरजूना वैद्यकीय खर्चासाठी मदत पुरविली, वेगवेगळे शैक्षणीक व सामाजिक उपक्रम केले. जानेवारी 2019 मध्ये शिक्षकांसाठी एक विज्ञान प्रशिक्षण शिबीर केले व त्यातूनच बहूसंख्य मुलांपर्यंत  पोहोचण्याचा मार्ग आम्हाला सापडला.  व त्यातूनच आकाश दर्शन, शाळांबरोबर विविध उपक्रम, कार्यशाळा, मेडिकल व डेंटल चेक अप व सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविले.

समाजसेवेचा वसा घेऊन ज्यावेळी आम्ही ज्ञानदानाच्या या  कामाला सुरवात केलो त्यावेळी माहित नव्हते कितपत यश मिळेल पण नंतर या प्रवासात खूप माणसांची सोबत लाभत गेली.  इच्छित धेय्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग आम्हाला सापडत गेला आणी  त्यातून अधिका अधिक काम होत गेले. 

साध्या सोप्या प्रयोगातून विज्ञान या कार्यक्रमाना मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद आमचा हुरूप वाढवितो आहे.  जानेवारी 2019 साली शिक्षकांसाठी विज्ञान  कार्यशाळा आयोजित केली त्यावेळी भाभा विज्ञान संस्थेचे  जोशी सर, पांडे सर, जुईली मॅडम यांनी सावंत फौंडेशन संचलित कै. डॉ रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र कळसुली येथे पहिल्या कार्यक्रमाची  मुहूर्तमेड रोवली गेली मधला काळ कोव्हिडं 19 मध्ये गेला त्या दरम्यान ऑनलाईन वर मुले व शिक्षकांबरोबर संवाद साधला होताच, बरेच ऑनलाईन कार्यक्रम केले. 

या वर्षी 2023 मध्ये प्रयोगातून विज्ञान साध्या, सोप्या आणि  उपलब्ध  साहित्यातून प्रयोग कसे करायचे आणि त्याचे अनुमान  कसे साधायचे  हे प्रशिक्षण शिक्षकांना दिले. आपल्या अथक मेहनतीतून भाभा अनुसध्यान आणि टीआयएफआर च्या सहकार्यांने साध्य केलेलं ज्ञान "प्रथम गुरू आणि मग  शिष्य" ही संकल्पना वापरून ज्ञानदानाचा वारसा निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु झाली. या प्रक्रियेचा पुढील एक भाग म्हणून  सावंत फौंडेशन ने आपल्या सायन्स सेंटरच्या कामाला सुरुवात केली आहे. या विज्ञान केंद्रातर्फे आकाश दर्शन, विज्ञान कार्यशाळा, सेमिनार, वेबिनार, विज्ञान प्रात्यक्षिक इत्यादी गोष्टी करण्यात येणार आहे.  सावंत फौंडेशन तर्फे इतर कार्यक्रमात आरोग्य शिबीर, डेंटल कॅम्प, वरिष्ठ नागरिक आणि एकल नागरिक मदत शिबिरे, करिअर मार्गदर्शन, तण आणि मन शांतीसाठी योगा शिबिरे,  आश्रमशाळेतील वृद्धांना व महिलांना अन्नवस्त्रे दान व संगीताचे आयोजन,  कोकणातील आश्रमाशाळेमध्ये अन्नदान, इतर आश्रमामध्येही अन्नदान, हस्तकला व  मूर्ती कला, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, शेतकी मार्गदर्शन, स्वयंरोजगार मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन अश्या प्रकारचे उपक्रम आम्ही केले आहेत. विविध क्षेत्रातील तज्ञ, विविध संस्था व अनेक मान्यवरांच्या सहभागातून व सहकार्यातून संस्थेची वाटचाल सुरू आहे आणि ही अविरत सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

 या वेळी विद्यामंदिर माध्यमिक विद्यालय कणकवली याना विज्ञान साहित्याची मदत दिली आमचे प्रयोजग साईटेक लॅब लिमिटेड म्हापे नाविमुंबई यांनी आम्हला शाळांना देण्यासाठी कोणिकल फ्लास्क देणगीस्वरूपात दिले. सामाजिक कार्याची ओढ असणारे असे असंख्य कार्यकर्ते,  हितचिंतक आमच्या पाठीशी जोडत गेले आहेत आणि जोडले जात आहेत आणि म्हणूनच हे सर्व शक्य होत आहे. समाजसेवेचा आणि ज्ञानादानाचा हा वसा असाच अखंड चालू ठेवत "उत्कृष्ट समाज निर्मिती साठी" या संस्थेच्या ब्रीद वाक्याला साजेसे काम करत राहायचे असल्याचे सावंत फौंडेशन सचिव शरद सावंत यांनी सांगितले.