कोलगाव जि. प. मतदार संघ ; भाजपकडून महेश सारंगांनी भरला फॉर्म

भाजपच्या नेत्यांचे मानले आभार
Edited by: विनायक गांवस
Published on: January 20, 2026 14:27 PM
views 119  views

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नेहमीच संधी दिली जाते. माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विश्वास टाकून मला उमेदवारीची संधी दिली याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे असे मत कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे भाजपचे उमेदवार महेश सारंग यांनी व्यक्त केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे तसेच खासदार नारायण राणे यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल श्री. सारंग यांनी विशेष आभार मानले. जनतेची साथ आणि कार्यकर्त्यांचा भक्कम पाठिंबा आपल्या पाठीशी असल्यामुळे आगामी निवडणुकीत आपला विजय हा भरघोस मतांनी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महेश सारंग यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. घोषणाबाजी आणि उत्साही वातावरणात अर्ज दाखल करण्यात आला.‌ याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी, स्थानिक नेते, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.