
वैभववाडी : तालुक्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. भाजपाकडून तगडे उमेदवार दिले आहेत. त्यामुळे निवडणूक रणधुमाळीला वेग आला आहे.
जिल्हा परिषदसाठी नावं
जिल्हा परिषदेसाठी भाजपाकडून तीन उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. कोळपे जिल्हा परिषद गटातून प्रमोद पुंडलिक रावराणे, कोकीसरे गटातून श्रावणी रोहन रावराणे, तर लोरे गटातून रिद्धी रितेश सुतार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पंचायत समितीसाठी नावं
तसेच पंचायत समितीच्या सहा जागांसाठी भाजपाने उमेदवारांची घोषणा केली आहे. भुईबावडा गणातून देवानंद पालांडे, कोळपे गणातून सुवर्णा महेश संसारे, उंबर्डे गणातून साची सचिन कोलते, कोकीसरे गणातून साधना सुधीर नकाशे, खांबाळे गणातून मंगेश लोके, तर लोरे गणातून सिद्धेश दिलीप रावराणे यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
भाजपाच्या या उमेदवार यादीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रचाराला वेग येणार आहे. आगामी निवडणुकीत भाजपाकडून ताकदीने लढत दिली जाणार असल्याचे संकेत या यादीतून स्पष्ट होत आहेत.










