मारुतीची कणीस पूजा आकर्षण

वेंगुर्ले येथे "सार्वजनिक श्री हनुमान जन्मोत्सव २०२५" ला प्रारंभ
Edited by: दिपेश परब
Published on: April 08, 2025 17:55 PM
views 163  views

वेंगुर्ले : श्री हनुमान मंदिर सेवा न्यास, वेंगुर्ला तर्फे श्री देव हनुमान मंदीर, वेंगुर्ला (मारुती मंदीर स्टॉप) येथे आज मंगळवार ८ एप्रिल पासून "सार्वजनिक श्री हनुमान जन्मोत्सव २०२५" ला प्रारंभ झाला. आज पहिल्या दिवशी मारुतीची मका म्हणजेच कणीस फळ पूजा साकारण्यात आली आहे. तर सायंकाळी खानोलकर दशावतार नाट्यमंडळ, खानोली यांचे दशावतारी नाटक सादर होणार आहे.

वेंगुर्ले येथे श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त पाच दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. उद्या बुधवार ९ एप्रिल रोजी सायं. श्री. दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचे नाटक, गुरुवार १० एप्रिल रोजी सायं. ७.०० वा वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ, तेंडोली यांचा ट्रिक्सीनयुक्त दशावतार नाट्‌यप्रयोग "अयोध्याधीश श्रीराम" शुक्रवार ११ एप्रिल  रोजी सायं. ७.०० वा. श्री रामेश्वर दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ला यांचे दशावतारी नाटक होणार आहे.

तर चैत्र शु. पौर्णिमा म्हणजेच शनिवार १२ एप्रिल  रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा होणार आहे. यामध्ये पहाटे. ४.३०. वा श्री मारुतीला अभिषेक व पुजा, पहाटे ५.०० वा. ह.भ.प. डॉ. रमेश पाटकर यांचे सुश्राव्य किर्तन, सकाळी ६.०० "श्री हनुमान जन्मोत्सव" कार्यक्रम होऊन पुष्पवृष्टी, आरती व तीर्थप्रसाद असणार आहे. तर सायं. ५.०० वा. श्री सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद, सांद. ७.०० वा. आरोलकर दशावतार नाट्यमंडळ, आरवली यांचा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. उत्सवात दर दिवशी सायं. ६.३० वा. श्री मारुतीरायाची आरती होईल. तरी सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन श्री हनुमान मंदिर सेवा न्यास, वेंगुर्ला तर्फे करण्यात आले आहे.