सोनाळीतील विवाहित तरुण बेपत्ता...!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 25, 2024 14:00 PM
views 614  views

वैभववाडी : तालुक्यातील सोनाळी वाणीवाडी येथील अनिल गजानन पाडावे (वय ४२)हा विवाहित तरुण (ता २४) पासून बेपत्ता झाला आहे.त्याचा भाऊ रघूनाथ पाडावे यांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीसांत दिली.

अनिल  यांचा शहरातील संभाजी चौकात पानाच छोटं दुकान आहे.बुधवारी (ता.२४) सकाळी आपण दुकानात जात असल्याचे सांगून ते घरातून बाहेर पडले.मात्र ते दुकानात गेले नाही.त्यांचा मुलगा नेहमी प्रमाणे शाळा सुटल्यानंतर दुकानात गेला.त्यावेळी वडील दुकानात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्याने मोबाईलवरून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.परंतु,त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या दुरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.परंतू तोही बंद अवस्थेत होता.त्यानंतर इतर नातेवाईकांकडे चौकशी केली मात्र तेथेही गेले नसल्याचे समजल्यानंतर रघूनाथ यांनी आज (ता.२५) वैभववाडी पोलीसात तक्रार दिली आहे.पोलीसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला असता अनिल हे वैभववाडी बसस्थानकातून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये बसल्याची माहिती मिळाली आहे.त्यादृष्टीने पोलीसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.