वेंगुर्ले पोलीस ठाण्याच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत बाजारपेठेत मार्गदर्शन

Edited by: दिपेश परब
Published on: September 02, 2023 16:46 PM
views 69  views

वेंगुर्ले : पोलीस यंत्रणेच्या रस्ता सुरक्षा अभियान अनुषंगाने वेंगुर्ला पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी वेंगुर्ला बाजारपेठ गाडीअड्डा नाका येथे रिक्षा-टेम्पो चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच दुचाकी वाहनधारक यांना वाहतुकीबाबत मार्गदर्शन केले.

   यावेळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी, रस्त्यावर अडथळा होईल अशी वाहतूक उभी करू नये, वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरू नये, टू व्हीलर वर हेल्मेट वापर नेहतीच करावा तसेच २ पेक्षा जास्त लोक बसू नये, रस्त्यावरील आखलेल्या पट्याच्या चिन्हाचा वापर करावा. १८ वर्षाखालील लहान मुलांच्या हातात वाहन देऊ नये, मोबाईल कानास लावून बोलत वाहन चालवू नये, बाजारपेठेच्या ठिकाणी रहदारीस अडथळा होईल अशा ठिकाणी वाहनाचे पार्कंग केलेले आढळल्यास संबंधित वाहनधारक मालकांवर ऑनलाईन दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.

   यावेळी गणेश चतुर्थी सण उत्साहात साजरा होताना कुठेही वाहनाची कोंडी होऊ नये यासाठी वाहन मालक-चालक यांनी दक्षता घ्यावी. अशी सुचनाही वहातुक पोलीस हवालदार मनोज परूळेकर यांनी केली.

   यावेळी वाहतूक पोलिस गौरव परब, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदेश कुबल, पोलिस हवालदार सुरेश पाटील, बंटी सावंत, पोलिस कोंस्टेबल अमर कांडर, तसेच रिक्षा चालक मालक संघटनेची माजी अध्यक्ष भगवान उर्फ भाई मोर्जे, गणपत रेडकर, अरुण नाईक, सतीश परब, काका पालकर, सदानंद परब, रिक्षा टेम्पो युनियन अध्यक्ष शेखर शेणई, मकरंद गोगटे, दिलीप बागवे, हर्षद पालव, चंद्रकांत चोडणकर, धोंड आदी उपस्थित होते.