कोमसापच्यावतीने सावंतवाडीत मराठी भाषा गौरव दिन

Edited by: विनायक गांवस
Published on: February 25, 2025 17:55 PM
views 65  views

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी आयोजित ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त, ज्येष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिवस दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता भोसले इंटरनॅशनल स्कुल, महादेव भाटले, शिल्पग्राम रोड, खासकीलवाडा-सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच होणारा हा मराठी भाषा गौरव दिवस कार्यक्रम आहे. 


यानिमित्ताने सकाळी ९.३० वा. ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. तद्नंतर, ज्येष्ठ साहित्यिक, कवी दादा मडकईकर यांचा खास चिमुकल्यांसाठी व ज्येष्ठांना बालपणात घेऊन जाणारा "आठवणीतील जुन्या कविता'' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.यावेळी कोमसाप सावंतवाडी शाखेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहतील, असे अध्यक्ष अँड संतोष सावंत, सह सचिव राजू तावडे यांनी म्हटले आहे.