दादा मडकईकर यांना मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड

Edited by:
Published on: February 16, 2025 14:21 PM
views 358  views

सावंतवाडी : मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड घोषित करण्यात आले असून मालवणी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून कोकणचे सुपुत्र, ज्येष्ठ मालवणी कवी गोविंद उर्फ दादा मडकईकर यांना गौरविण्यात येणार आहे. 'याद तेची येता...!' या गीतासाठी हा सन्मान त्यांना मिळाला आहे.

मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड मालवणी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून दादा मडकईकर यांना गौरविण्यात येणार आहे. दादांनी 'चांन्याची फुला', 'आबोलेचो वळेसार', 'कोकण हिरवेगार' असे मालवणी काव्यसंग्रह लिहिले आहेत. आपल्या खास शैलीनं रसिकांच्या हृदयात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कोकणातली लोकसंस्कृती, सणवार, परंपरा, लोककला आणि इथला निसर्ग त्यांनी आपल्या काव्यातून उलगडला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे.