मराठी भाषा दिन निमित्त विविध स्पर्धा !

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 20, 2024 11:41 AM
views 107  views

कणकवली : मंगळवार २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठी भाषा दिन निमीत्त सकाळी ठीक १०.३० वा जि प शाळा कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे नाटळ- सांगवे व हरकुळ जि. प. मतदार संघ मर्यादित विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

दिनांक २७ फेब्रुवारी २०२४...सकाळी ठीक १०:३० वा कथाकथन स्पर्धा गट इ १ते ४ (वेळ ३ मिनीट) विषय – बोधकथागट ५ ते ७ (वेळ ५ मिनीट) विषयः साहसकथा हस्ताक्षर स्पर्धा गट इ १ ते ४गट ५ ते ७ निबंध स्पर्धा गट इ १ते ४ (शब्दमर्यादा १००) विषय-१) मला आवडलेली गोष्ट२) मी अंतराळवीर झालो तर ३) माझे आवडते पुस्तकगट ५ ते ७ (शब्दमर्यादा २००) विषय: १) वाचाल तर वाचाल. २) भारताची चंद्रयान-३ मोहीम ३) पुस्तकाचे आत्मवृत्त सर्व स्पर्धांतील प्रथम तीन क्रमांकाना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सर्व गटात २ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.

तरी सर्वांनी सहभागी होण्याचे व अधिक माहितीसाठी नरेंद्र चिंदरकर (८६९८७०३०८६) किंवा वाचनालय सचिव नाना काणेकर यांना संपर्क साधण्याचे आवाहन संदेश उर्फ गोट्या सावंत अध्यक्ष ग्राम वाचनालय आणि संजना संदेश सावंत, अध्यक्षा युवा संदेश प्रतिष्ठान तथा माजी अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांनी केले आहे.