
कणकवली:कणकवली शहरातील मराठा मंडळ रोडवर वादळी वाऱ्यामुळे आज सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास झाड पडल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस बंद झाला होता. मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी तात्काळ याची दखल घेऊन नगरपंचायत कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले व काही वेळातच नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी झाड हटवून रस्ता वाहतुकीस खुला केला. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याबाबत नगरपंचायत चे लक्ष वेधले होते. त्यानंतर काही वेळातच श्री नलावडे हे देखील घटनास्थळी दाखल झाले. मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या सुचने नुसार नगरपंचायत स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, मनोज धुमाळे, मिथुन ठाणेकर आदींच्या पथकांनी हे झाड हटवून रस्ता खुला केला.
तसेच या झाडांमुळे रस्त्याच्या शेजारी असणारे गणेश वराडकर यांच्या गॅरेजवर झाड पडल्याने पाच ते सहा दुचाकी या निकामी झाल्या तसेच त्यांच्या शेडवर झाड पडल्याने लाखोंचे नुकसान या गॅरेजचे झाले. तिथे देखील जाऊन माझी नगराध्यक्ष समिर नलावडे यांनी नुकसानाची पाहणी केली व गैरेंज मालकाला धीर दिला.