मराठा लाईफ इन्फंट्रीचा ५० वा रेजिंग डे उत्साहात

Edited by:
Published on: March 03, 2025 17:49 PM
views 203  views

सावंतवाडी : येथील काझी शहाबुद्दीन सभागृहात १८ वी बटालियन दी मराठा लाईफ इन्फंट्रीचा ५० वा रेजिंग डे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून श्रीमती उज्वला रामचंद्र पडते, रामा गावडे, सुरेश मर्गज, विष्णू तामाणेकर, अरविंद परब, मंगेश सावंत, संजय पालकर, स्वप्निल सावंत, सुभाष केसरकर, तुकाराम गावडे, अजित सावंत, प्रयास सावंत, अरुण गावडे, धोंडीराम सावंत, पीटर गोम्स यांसह अन्य मान्यवर उपस्थित होत

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते केक कापून स्थापना दिवसाचे सेलिब्रेशन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी 'रेझिंग डे' ही संकल्पना समजावून सांगताना आपल्या मराठा बटालियनचा इतिहास विशद केला. तसेच पन्नासव्या रेझिंग डे निमित्त शुभेच्छा बहाल करण्यात आल्या.यावेळी मराठा लाईफ इन्फंट्री याबाबत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर कौटुंबिक स्नेह मेळावा आयोजित करून स्नेहभोजनाचा आनंद घेऊन एकमेकांना स्नेहपूर्ण निरोप देण्यात आला. दरम्यान 'रेझिंग डे' निमित्ताने खूप वर्षांनी अनेक माजी सैनिक एकमेकांना भेटून सुख-दुःखांची विचारपूस करण्यात आली व पुन्हा नव्या उत्साहाने भेटण्याचा संकल्प करत कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व माजी सैनिक शिलेदारांनी प्रयत्न केले.