मराठा समाजावर ज्या ज्या वेळी अन्याय होईल तेव्हा रस्त्यावर उतरणार : सुशांत नाईक

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 04, 2023 20:20 PM
views 485  views

कणकवली : मला समाधान आहे की मी या मराठा  मोर्चामध्ये सहभागी झालो. कारण दोन वर्षांपूर्वी झालेल्या मोर्चामध्ये देखील  मी सहभागी होतो आणि आताही सहभागी आहे  समाजाचा एक घटक म्हणून  याचाच मला अभिमान आहे. भविष्यात आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी मी या मोर्चामध्ये सहभागी झालो आहे. समाजाच्या हितासाठी जे काही करावे लागेल ते मी करणार असल्याचे  युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सांगितले.

तसेच जालना येथील मराठा समाजाच्या समाज बांधवांवर जो लाठीचार्ज झाला त्याचा निषेध देखील या मोर्चाच्या माध्यमातून  सुशांत नाईक यांनी केला आहे. भविष्यात ज्या ज्या वेळी मराठा समाजावर अन्याय होईल त्यावेळी आपण रस्त्यावर उतरू असे देखील त्यांनी सांगितले.