मराठा समाजाची दोडामार्ग 'तहसील'ला धडक

Edited by: संदीप देसाई
Published on: September 05, 2023 17:29 PM
views 83  views

दोडामार्ग : छत्रपती शिवाजी महाराज की जय, आवाज फक्त मराठ्यांचा, एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत अखिल भारतीय मराठा महासंघ, दोडामार्गच्या वतीने मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा नेत जालना येथील आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध नोंदविण्यात आला. 

     जालन्यात मराठा समाजाच्यावतीने आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जच्या निषेधार्थ दोडामार्गात मराठा समाज बांधव मंगळवारी येथील गणपती मंदिरात एकत्रित आले. त्यानंतर तेथुन तहसिल कार्यालयात जात नायब तहसिलदार व्ही. बी. बाडकर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, आवाज फक्त मराठ्यांचा, एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत परिसर दणाणुन सोडला. ज्या पोलिस अधिकारी यांनी लाठीमाराचे आदेश दिले अशा अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे, जालन्यातील लाठी मारहाणीची चौकशी पोलिस प्रशासनाकडुन न करता निवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मार्फत करण्यात यावी. जखमी मराठा आंदोलकांना नुकसान भरपाई देण्यात यावी व मराठा आंदोलकांवरील गुन्हें मागे घेण्यात यावेत आदी मागण्या या निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अॅड. सोनु गवस, सचिव उदय पास्ते, यांसह निलम गवस, बाबुराव धुरी, प्रदिप चांदेलकर, दयानंद धाऊसकर, प्रवीण परब, सूर्यकांत गवस, संदिप घाडी, दिवाकर गवस, संतोष घोगळे,  ज्ञानेश्वर गवस, पुनाजी गवस, शैलेश दळवी, कृष्णा सावंत, दत्ताराम देसाई, सुभाष लोंढे, महेश गवस, यांसह अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.