वायंगवडेत ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 03, 2024 11:25 AM
views 136  views

मालवण : वायंगवडे गावचे माजी सरपंच आनंद सावंत यासह ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी प्रवेशकर्त्या सर्वांचे भाजपात स्वागत केले. केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून वायंगवडे गावच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे धोंडी चिंदरकर यांनी प्रवेशकर्त्यांना आश्वासित केले आहे. 

यावेळी प्रवेशकर्ते माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य आनंद सावंत, शशिकांत वायंगवडेकर, सूर्यकांत नेरूरकर, मधुकर वायंगवडेकर, सुनील प्रभू, उत्तम परब, सागर परब, मंदार प्रभू, सिद्धेश प्रभू, संदीप सुद्रीक, संदेश वायंगवडेकर, रुपेश परब, विजू परब, मनोज नाईक, प्रदीप परब, प्रभाकर परब, दाजी वायंगवडेकर, शैलेश सावंत, शुभम नेरूरकर, चंदू वायंगवडेकर, आयुष सावंत, रितेश परब, साईश प्रभू, राकेश प्रभू, समीर प्रभू यासह अनेकांनी प्रवेश केला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यासह भाजपा किसान मोर्चा उपाध्यक्ष जयवंत परब, शक्ती केंद्रप्रमुख विनायक परब, बूथ अध्यक्ष विजय परब, युवा कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर परब, यासह अरुण परब, बाळकृष्ण घाडी, संजय परब, सतीश परब, विजय सकपाळ, काशीराम परब, सीता मेस्त्री, विष्णू मेस्त्री, सुबोधिनी कोचरेकर, दिनेश परब, संदीप परब, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.