तेरेखोल खाडीत आढळला पुरुषाचा मृतदेह

Edited by: विनायक गांवस
Published on: August 31, 2025 14:07 PM
views 210  views

सावंतवाडी : तळवणे खिरोईवाडी खार बंधारा येथील तेरेखोल खाडी पाण्यात एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह सापडला असून त्याचे वय 43 असल्याचे अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याची सावंतवाडी पोलीस ठाणेमध्ये आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.


या घटनेची खबर महादेव शशिकांत केरकर (वय 43 रा- तळवणे सुमेवाडी ता.सावंतवाडी) यांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, सहा पोलिस निरीक्षक शिंदे यांनी भेट दिली. आरोंदा पोलिस दुरक्षेत्राचे बीट अंमलदार अरवारी हे पोलीस निरीक्षक  चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत. मृत व्यक्तीच्या उजव्या हातामध्ये रुद्राक्षाची माळ असून अंगावर निळसर फिकट रंगाची जीन्स पॅन्ट व बनियन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही आहे.