सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव, पत्रकार कै. प्रवीण मांजरेकर यांच्या सातोसे येथील निवासस्थानी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.
पत्रकार प्रवीण मांजरेकर यांच्या निधनाने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. तुम्हा कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सदैव सहभागी आहोत, असे सांगत त्यांना धीर दिला.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, संचालक महेश सारंग, माजी संचालक गुरुनाथ पेडणेकर, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार सचिव मयूर चराटकर सदस्य सचिन रेडकर रवी गावडे सातोसे उपसरपंच रुपेश साळगावकर, माजी सरपंच बबन सातोस्कर, तंटामुक्त समिती अध्यक्ष वसंत धुरी, पत्रकार संतोष राऊळ आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.