मनिषची मृत्यूशी झुंज अपयशी..!

Edited by: विनायक गांवस
Published on: June 09, 2024 14:26 PM
views 1480  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालया शेजारी काम करताना जेसीबीची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या मनिष महादेव देसाई (वय १९, रा. खासकीलवाडा- कोठावळे पाणंद) या युवकाचा गोवा-बांबोळी येथे उपचारादरम्यान आज दुपारी २ वाजता मृत्यू झाला. सोमवारी  त्याच्या पार्थिवावर सावंतवाडी उपरलकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

उपजिल्हा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना त्याठिकाणी जेसीबी काम करत होता. योग्य खबरदारी न घेतल्यानं हा अपघात घडला. यात मनिष महादेव देसाई गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान रविवारी दुपारी दोन वाजता गोवा बांबुळी येथे त्याची प्राणज्योत मालवली. बारावीचे प्रमाणपत्र आणण्यासाठी महाविद्यालयात जात असताना उपजिल्हा रुग्णालयासमोर त्याचा अपघात घडला होता. येथील काम करणारा जेसीबीचा फाळका लागून त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्याला अधिक उपचारासाठी तात्काळ गोवा-बांबूळी येथे हलविण्यात आले होते. रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. देसाईंचा तो एकुलता एक  मुलगा होता. त्याच्या अपघाती जाण्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचा मित्रपरिवारासह सावंतवाडीत शोककळा पसरली आहे.