
सावंतवाडी : गोव्याच्या प्रसिद्ध मणिपाल हॉस्पिटलची ओपीडी आता सावंतवाडीतही सुरू होत असून मणिपाल हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर रुग्णांना आपली सेवा देणार आहेत. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी प्रसिद्ध गॅस्ट्रो तज्ञ डॉ. रोहन बडवे सावंतवाडीत उपलब्ध असतील. पोटाचे विकार, लिव्हरचे आजार, कावीळ, पेप्टीक अल्सर यासारख्या आजारांवर ते उपचार करतील. सकाळी 8.30 ते 11 या वेळेत ते आपल्याला भेटू शकतील.
प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ. श्रीधरन एम. हे आपल्याला प्रत्येक महिन्याच्या शुक्रवारी सकाळी 10.30 ते दुपारी 3 या वेळेत भेटू शकतील. ते कॅन्सरच्या विविध आजारांवर उपचार आणि मार्गदर्शन करतील.
गुडघेदुखी, सांधेदुखी, जॉईंट रिप्लेसमेंट, यासारख्या आजारांवर प्रसिद्ध जॉईंट रिप्लेसमेंट तज्ञ डॉ. रोहन देसाई आपल्याला प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत उपलब्ध होतील. यामध्ये गुडघेदुखी, सांधेदुखी यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचारा संदर्भात ते मार्गदर्शन करतील.
मणिपाल हॉस्पिटलची ही ओपीडी सेवा आपल्याला सावंतवाडी येथे चितारी हॉस्पिटल अँड क्रीटी केअर, भोमवाडी, कोलगाव,b सावंतवाडी येथे उपलब्ध होईल. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 02363 291838 आणि 9168550821