आंबा - फळबागायतदार संघाचं नितेश राणेंना विविध मागण्यांसाठी निवेदन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 12, 2024 14:19 PM
views 130  views

देवगड : देवगड येथील आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ यांच्या वतीने आ. नितेश राणे यांची भेट घेऊन आंबा बागायतदारांच्या विविध समस्या शासनदरबारी मांडण्यासाठी आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ यांचे पदाधिकारी यांनी आ. नीतेश राणे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात पिकविमा परतावा, थ्रिप्स किडरोग संशोधन व त्यासंबंधी चे विषय यावर चर्चा केलीआहे.

नितेश राणे यांनी सांगितले की पिकविम्यासंदर्भात नाम.नारायण राणे हा विषय केंद्रसरकाच्या निदर्शनास आणून देतील त्यानुसार खास. नारायण राणे,कृषिमंत्री,उपमुख्यमंत्री, स्वतः व तुमचे ३-४ प्रतिनिधी यांची एकत्रितपणे चर्चा घडवून आणून फळपिक विम्याचा प्रश्न निकाली काढू.तसेच मार्केटयार्डचा प्रश्न निकाली लागलेला आहे. त्यामुळे नजिकच्या काळात मार्केटयार्ड उभे राहीलेल दिसेल.या वेळी संघाचे अध्यक्ष .विलास रूमडे सचिव संकेत लब्दे संस्था सदस्य हरीश्चंद्र गोडे सत्यवान गावकर धनंजय गोडे, इंद्रनील कर्वे, दत्तात्रेय बलवान, कुंदन घाडी, शरद गोडे, विजय सावंत, नरहरी सोमले, शिवराम यादव आदी आंबा व फळबागायतदार संघ देवगड चे सदस्य उपस्थित होते.