बागेतील आंबा - नारळ चोरीला

Edited by: विनायक गांवस
Published on: April 17, 2025 10:53 AM
views 199  views

सावंतवाडी : मळगाव-कुंभार्ली येथील आंबा व नारळ बागेतील दोन हजार हापूस आंबे व ५०० नारळ अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची तक्रार मळगाव येथील अॅड. दिगंबर गावकर यांनी बुधवारी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. बुधवारी सकाळी गावकर व त्यांचे बंधू डॉ. महादेव गावकर हे आपल्या मजुरांसह बागेत गेले असता हा प्रकार उघडकीस आला.

गावकर हे आपल्या बागेत सोमवार व मंगळवारी गेले नव्हते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बागेतील दोन हजार हापूस आंबे व माडावरील ५०० नारळ चोरीस गेल्याचे बुधवारी सकाळी उघड झाले. याबाबत दिगंबर गावकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली आहे अशी माहिती दिगंबर गावकर यांनी दिली.