
देवगड : देवगड तालुक्यात यावर्षी देवगडहापूस आंब्याचे उत्पादन कमालीचे घटलेले असतानाच मार्केटमध्ये आंब्याचा घसरलेला दर, अंतिम टप्प्यात फळमाशीचा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त अशी स्थिती निर्माण झाली आंबा बागायतदारांचे आर्थिक गणित त्यामुळे कोलमडले. म्हणजेच दुसऱ्याच टप्प्यात यावर्षीचा आंबा हंगाम संपल्यामुळे यावर्षीच्या आंबा हंगामाची मे महिन्यातच अखेर झाली. असल्याने यावर्षीचा आंबा हंगाम लवकरच संपला असे बागायतदारांमधून सांगितले जात आहे. आंब्याचे उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्केच यावर्षी होते.
यावर्षी आंब्याचे उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्केच राहिले. त्यात दुसऱ्या टप्प्यातील आंबा मोठ्या प्रमाणात एकाच वेळी तयार झाल्याने आंबा काढून तो विक्रीसाठी बाजारपेठेत पाठविण्यासाठी बागायतदारांना कसरत करावी लागली. जानेवारी महिन्यात मोहर आलेला आंबा एप्रिल महिन्यात एकदम तयार झाल्याने आंबा काढण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाल्याने तयार सर्वच आंबा काढणे शक्य झाले नाही, परिणामी काही ठिकाणी कलमांवरच तयार झालेला आंबा उष्णतेमुळे गळून जमिनीवर पडल्याने बागायतदारांचे नुकसान झाले.शिवाय एकाच वेळी मोठ्या प्रमाणात आंबा मार्केटमध्ये आल्याने आंब्याचे दर कमालीचे घसरले. पेटीला केवळ १००० ते १२०० रूपये दर मिळाला, अशी गंभीर स्थिती बागायतदारांवर आल्याचे जामसंडे येथील आंबा बागायतदार मंगेश धुरी यांनी सांगितले.
दुसऱ्या टप्प्यातील आंब्याला स्थानिक बाजारपेठेत प्रतवारीप्रमाणे सुरूवातीला डझनी १ हजार तर त्यानंतर ७००, ५०० रू. असा दर मिळाला. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून बाजारपेठेत आंबा मोठ्या प्रमाणात होता. मात्र, आता दुसऱ्या टप्प्यातील आंबा संपल्याने स्थानिक बाजारपेठांमध्येही आंबा ना के बाराबर झाला असल्याने यावर्षीच्या आंबा हंगामाची मे महिन्या च्या सुरूवातीलाच अखेर झाली आहे असे आंबा बागायतदार महेश सावंत यांनी सांगितले आहे. आंबा सिझन च्या अंतिम टप्यात फळमाशीचा प्रादुर्भाव वाढलामुळे आंबा कॅनिंगला द्यावा लागला. मात्र कॅनिंगसाठीही यावर्षी आंबा कमी प्रमाणात उपलब्ध आहे.
चाकरमान्यांचा हिरमोड
यावर्षी झाला आहे.आंब्याचे घटलेले उत्पादन, मुंबई वाशी मार्केटमध्ये आंब्याचे कमालीचे घसरलेले दर यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी स्थिती झाली .मे महिन्यात मोठ्या प्रमाणात सुट्टी असल्यामुळे पर्यटक, चाकरमानी मंडळी गावात येतात. मात्र त्या प्रमाणात आंबा उपलब्ध नसल्याने खास हापूस आंबा खरेदी करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही मे महिन्यात आंबा उपलब्ध होऊ शकेल की नाही हे सांगता येणार नाही, अशी स्थिती आहे.सध्या कॅनिंग व्यवसाय सुरू आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे कॅनिंगसाठी आवश्यक आंबाही मिळणे दुरापास्त झाले आहे. सध्या कॅनिंगचा दर ४२ ते ४४ रूपये किलो आहे. मात्र देवगड तालुक्यातून दिवसाला ६० ते ७० टनच आंबा कॅनिंगला मिळत आहे.