आंबा बागायतदारांची नुकसानभरपाईची मागणी..!

Edited by:
Published on: January 15, 2024 14:01 PM
views 237  views

देवगड : देवगड येथील आंबा बागायतदारांन समोर  गेली ३ - ४ वर्षे वातावरणात सतत होणाऱ्या अचानक बदलामुळे आबा पीक हंगामात कमी आंबा पीक व वाढता खर्च अशी अंबा बाग्यतदरांची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे फार मोठ्या आर्थिक नुकसानीला आंबा बागायतदारांना सामोरे जावे लागत आहे.

यावर्षी देवगड येथे ८-९-१० जानेवारी ला अवकाळी पाऊस अचानक कोसळला, या अवकाळी पावसामुळे कोकणातील प्रमुख पिक आंबा व काजू याला त्याचा तीव्र फटका बसलेला.हा पाऊस सुमारे ३३ मिमी पडला दि.८ जानेवारी  दि.९ जानेवारी व  १० जानेवारी ला सलग पडल्यामुळे मोहोर व छोटी फळे जमिनीवर कोसळून बागायतदारांचे फार मोठे नुकसान झाले आहे. तसेच मोहोर कुजून पडल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अतिपावसामुळे छोटी फळे गळून पडलेली आहेत व शिल्लक राहीलेल्या फळांवर पाणी साचून राहील्यामुळे काळे डाग पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आहे.

हे सर्व अचानक घडल्यामुळे बरेच वेळा फवारणी करावी लागते आणि त्यासाठी महागडी किटकनाशके व बुरशीनाशके वापरावी लागतात त्यामुळे यावर्षी हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांवर फार मोठे संकट आलेले आहे.शेतकरी आर्थिक दृष्टया हतबल झालेला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ देवगड यांच्या वतीने देवगड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.