'अवकाळी'मुळे नुकसान झालेल्या बागायतदारांना दिलासा द्या

कॉंग्रेसने वेधलं लक्ष
Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 12, 2024 13:44 PM
views 120  views

देवगड : अचानक वातावरणातील बदला मुळे गेल्या दोन-तीन दिवसात पडलेल्या पावसामुळे तसेच दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे  आंबा पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.त्यामुळे सर्व शेतकरी संकटात सापडला आहे. दिवसेंदिवस फवारणी कीटकनाशके यांचे दर आणि औषध विक्रेते कंपन्यांचा सुळसुळाट देवगडमध्ये जोरात आहे. वर्षानुवर्षी या कंपन्यांच्या व दलालांचा यामुळे फायदाच होतो. मात्र शेतकरी देशोधडीला लागला पहायला मिळतो. त्यावर पर्याय म्हणून  पीक विम्याचा मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात यावा. तसेच औषध विक्रेत्यांना कंपन्याना तंबी देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यात यावा.

देवगडमधील शेतकऱ्यांना बागायतदारांना दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देवगड तालुका कृषी विभाग व देवगड तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, माजी तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, तुषार भाबल, सज्जाउद्दीन सोलकर, सुरेश देवगडकर आदी उपस्थित होते.