
वेंगुर्ला:
सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि वेंगुर्ला खरेदी विक्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २ मार्च रोजी दुपारी ३ वाजता साई मंगल कार्यालय येथे आंबा बागायतदार, शेतकरी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी यांच्यासाहित तज्ञ आंबा व्यावसायिक, उद्योजक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तर वेंगुर्ला तालुक्याचा आंबा विक्रीचा ब्रँड तयार करण्याबाबत चर्चा व निर्णय यावेळी घेण्यात येणार आहेत. या मेळाव्याला जास्तीत जास्त आंबा बागायतदार व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.