मंगेश धुरी यांची आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना..!

Edited by:
Published on: January 27, 2024 14:12 PM
views 399  views

देवगड : देवगड  येथील प्रतिथयश आंबा बागायतदार मंगेश धुरी यांची मुहूर्ताची पहिली देवगड हापूस आंबा पेटी नवी मुंबई वाशी मार्केट येथे आज पाठविण्यात आली..हापुस आंब्याची त्यांची हि पहिली पेटी मुंबईला रवाना झाली असून. देवगड जामसंडे येथील प्रसिद्ध आंबा व्यापारी मंगेश धुरी यांची यावर्षीची हि पहिली सहा डझन हापुस आंब्याची पेटी मुंबई येथील वाशी मार्केटला रवाना झाली. 

हापुस आंब्याला जागतिक स्तरावर पोहचविणारे मंगेश धुरी बंधूंनी जानेवारी च्या मुहूर्तावर हापुस आंब्याची पहिली पेटी मुंबईला पाठविली आहे. ते सप्टेंबर ते ऑक्टोंबर नोव्हेंबर काळात त्यांच्या आंबा कलम बागेत मोहर आला होता. हा मोहोर त्यांनी मेहनत करून हा मोहोर वाचवला. या काळात पाऊस होऊन सुध्दा कोणतेही झाडाला छप्पर न करता त्यांनी आलेला आंबा मोहोर वाचवला. त्यांच्या आंबा बागेत अजून काही पेट्या आंबा असून पुढील आठवड्यातच हा आंबा मुंबई वाशी मार्केट येथे रवाना होणार असल्याचे मंगेश धुरी यांनी सांगितले.