देवगड : देवगड येथे हापूस आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ देवगड यांच्यावतीने बाळूमामा मंदीर दाभोळे कोंडामा येथे हापूस व शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून बायर क्राॕप सायन्स इंडीया यांच्यावतीने हापूस आंबा पिक संरक्षण मार्गदर्शन सत्र तसेच वार्षिक सर्व साधारण सभेचे आयोजन करणेत आले होते.
या मार्गदर्शन मेळाव्यात स्थानिक आंबा शेतकरी तसेच बागायतदार यांनी आपआपली मते या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने मांडली. यावेळी देवगड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या मेळाव्यामध्ये बायर क्रॉप्स सायन्स व्यवस्थापक सातारा व कोकणचे वैभव कोठेकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे पी.एस.आय सुधीर कदम व हेड कॉन्स्टेबल महाडिक यांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी देवगड हापूस आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ देवगडचे अध्यक्ष विलास मुकुंद रुमडे, उपाध्यक्ष रामदास अनंत अनभवणे, सचिव संकेत रमेश लब्दे, सहसचिव चंद्रकांत लवू गोईम, खजिनदार शुभम रघुवीर चौगुले, सदस्य सुधाकर शामसुंदर वाळके, सत्यवान अभिमन्यू गावकर, गुरुनाथ गणपत राणे, प्रसाद सखाराम परब, समशेर दाऊद खान, प्रकाश सखाराम डांबरी, बबन रघुनाथ बोडेकर, हरिश्चंद्र लक्ष्मण गोडे, नारायण शंकर गोगटे, संजय सिताराम धुरी, निलेश अविनाश पेडणेकर, प्रियांका प्रवीण रासम आदी सदस्य या शेतकरी मेळाव्यास उपस्थित होते. तसेच बागायतदार शेतकरी या मेळाव्यामध्ये उपस्थित होते. यावेळी आभार प्रदर्शन संकेत लब्दे यांनी केले.