आंबा पिकाचं कसं करावं संरक्षण ?

नेमळे - धाकोरेत मार्गदर्शन
Edited by: विनायक गांवस
Published on: January 04, 2024 17:09 PM
views 214  views

सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे व धाकोरे येथे शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणुन फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथील डॉ. गोपाळ  गोळवणकर, डॉ. प्रमोद तल्हा हे उपस्थित होते.

यावेळी आंबा पीक संरक्षण, किटकनाशकांची हाताळणी सेंद्रिय जैविक पद्धतीने किड रोग नियंत्रण, चिकट सापळ्यांचा वापर, खोडकीडा नियंत्रण इत्यादीबाबत उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सिंधुरत्न योजनेतुन रक्षक सापळ्यांचा लाभ घेउन सामुहीकपणे फळमाशी नियंत्रण करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे आयोजन नेमळे कृषी सहाय्यक निरवडेकर यांनी केले. यावेळी नेमळे येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर धाकोरे येथे शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथील डॉ. गोपाळ गोळवणकर यांनी आंबा काजू पिक संरक्षण , यशवंत गव्हाणे यानी चिकट सापळ्यांचा  प्रभावी वापराबाबर प्रात्यक्षिक  दाखवले व सिंधुरत्नमधून अनुदानावर उपलब्ध होणाऱ्या फळमाशी सापळ्यांचा वापर करावा असे आवाहन केले. BTM मिनल परब यांनी जैविक शेती मिशन व गट नोंदणी बाबत मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक प्रिया पवार यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले. यावेळी धाकोरा सरपंच स्नेहा मुळीक, तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य व  शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.