
देवगड : देवगड तालुक्यात गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी पहाटे वातावरणात अचानक बदल होऊन अवकाळी पाऊस व जोराचे वारे वाहू लागले व विजेच्या लखलखाट मुसळधार पाऊस पडल्याने आंबा पिकाचे या वादळी हवामानात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून काजू बागायत यांची देखील नुकसान झाले आहे.
सद्यस्थितीत हे वातावरणात आंबा मोहराला हानिकारक झालेले असून या कृषी प्रशांत देशात कृषी अधिकारी विभागामार्फत आवश्यकती कार्यवाही योग्य वेळी होत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. तरी या सर्वांचा सहानभूतीपूर्वक विचार करून नुकसानीची पंचयादी करण्यात यावी व शेतकरी बंधूंना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी उद्धव वाळासाहेव ठाकरे शिवसेनेच्यावतीने तालुकाप्रमुख रवींद्र जोगल यांच्या शिष्टमंडळाने देवगड तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
याबाबत गांभीर्याने विचार करून शेतकरी बंधूंना न्याय देण्यात यावा, अन्यथा शिवसेना प्रेरित विचाराने आंदोलन करावे लागेल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. या शिष्टमंडळात तालुका प्रमुख रविंद्र जोगल, महिला आघाडी संघटक हर्षा ठाकूर, युवासेना अध्यक्ष गणेश गावकर, माजी सभापती रेश्मा सावंत, नगरसेवक नितीन बांदेकर, योगेश गोळम, बाळा कणेरकर, दिनेश पारकर व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.