कणकवलीतील रिक्षा व्यावसायीक मंगेश राणे यांचे निधन

Edited by:
Published on: October 14, 2024 13:50 PM
views 223  views

कणकवली :  कणकवली शहरातील स्वयंभू मंदिरनजीक निमेवाडी येथील रहिवासी, रिक्षा व्यावसायीक मंगेश उर्फ बाबू सूर्यकांत राणे (५५) यांचे रविवारी सकाळी ११.३० वा. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. शहरातील धार्मिक, सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार ही मोठा होता. जाणते गावपुरुष म्हणूनही ते परिचित होते.  त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सून, भाऊ, भावजय, काकी, पुतणे असा मोठा परिवार आहे.