SSC RESULT 2023 ; माणगावचा निकाल 95.80 टक्के

Edited by: भरत केसरकर
Published on: June 02, 2023 17:03 PM
views 135  views

कुडाळ : माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री.वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव चा दहावीचा निकाल 95.80% लागला आहे.प्रथम क्रमांक कुमार गावडे साहिल गुरुनाथ 93.80%,  द्वितीय क्रमांक कुमारी काशीद शर्वरी अण्णासाहेब 92.60,  तृतीय क्रमांक कुमारी पाटकर प्रणवी मोहन 92.40 हे पहिले तीन यशस्वी विद्यार्थी आहेत.


दहावीसाठी एकुण 143 विद्यार्थी बसले होते. त्यात 137 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तर फक्त 6 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले .विशेष श्रेणीत -47 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत-56 विद्यार्थी आहे. 

    यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक प्रशांत धोंड, उप मुख्याध्यापक संजय पिळणकर, पर्यवेक्षक सी.डी.चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे. तर या निकालानंतर संस्थाध्यक्ष सगुण धुरी,उपाध्यक्ष बाळा जोशी,मुख्य कार्यकारी वि.न.आकेरकर, सचिव एकनाथ केसरकर,संचालक बाली नानचे,महेश भिसे,दत्तदिगंबर धुरी,साईनाथ नार्वेकर,चंद्रशेखर जोशी यांनी शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांचे अभिनंदन केले आहे.प्रशाळेने यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.