माणगाव खोरे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा..!

Edited by: भरत केसरकर
Published on: February 10, 2024 13:38 PM
views 196  views

कुडाळ :  भाजपा माणगाव खोरे कार्यकर्ता मेळावा आज माणगाव बाजार येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे होत आहे. माणगाव खोऱ्यातील भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता मेळावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्याच्या ठिकाणी नारायण राणे आणी माजी खासदार निलेश राणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. याबरोबरच या मेळाव्यास माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, रणजित देसाई, मनिष दळवी, संध्या तेर्से, संदीप कुडतरकर, सगुण धुरी, पांडुरंग कोंडसकर, बंड्या सावंत, दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, दादा बेळणेकर, रूपेश कानडे, मोहन सावंत, विकास कुडाळकर, महेश भिसे, केशव भर्तू, दिपक काणेकर, पप्प्या तवटे आदि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत. नारायण राणे काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.