BREAKING | भाजपकडून माणगाव ग्रामपंचायत सरपंचपद उमेदवारीची माळ अखेर सौ. दुर्वा दिपक काणेकर यांच्या गळ्यात !

आता लक्ष्य बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या भूमिकेकडे
Edited by: भरत केसरकर
Published on: December 07, 2022 12:30 PM
views 1008  views

कुडाळ : माणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची भाजपकडून उमेदवारीची माळ अखेर सौ. दुर्वा दिपक काणेकर यांच्या गळ्यात // तीन उमेदवार होते प्रबळ दावेदार // सौ.दुर्वा दिपक काणेकर, भावना कृष्णा सावंत, कामिनी केशव भर्तू या तीन उमेदवारात होती जोरदार रस्सीखेच // तिघांकडून जोरदार केले गेले होते लाॅबिंग // माणगाव बाजार येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात भाजपच्या महत्वपूर्ण बैठकीनंतर मोहन सावंत यांनी केली घोषणा // वरिष्ठांचा कौल व निर्णय घेवून मोहन सावंत यांच्यासह भाजपच्या टिमकडून घोषणा // मोहन सावंत, सगुण धुरी, प्रकाश मोर्ये, जोसेफ डाॅन्टस, पांडुरंग कोंडसकर, महेश भिसे, सचिन धुरी यांच्यात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीनंतर भाजपने घेतला निर्णय // या बैठकीकडे होते सर्वाचे लक्ष // बंडखोरी रोखण्याचे भाजप समोर होते मोठे आव्हान // इच्छुक उमेदवारांची होत होती घालमेल सुरू // चाहत्यांची धडधड वाढल्यानंतर काही वेळातच करण्यात आली घोषणा // आता लक्ष्य बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या भूमिकेकडे //