
सावंतवाडी : सिंधुदुर्ग आकाशवाणीवर शुक्रवार १६ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता सावंतवाडीतील कवयित्री, लेखिका आणि 'तरुण भारत संवाद'च्या उपसंपादक मंगल नाईक-जोशी यांचे कथावाचन होणार आहे. या कार्यक्रमात त्यांनी स्वलिखित 'निर्धार' कथेचे मंगल नाईक-जोशी वाचन केले आहे. निवेदिका संजीवनी पालयेकर यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले आहे. आकाशवाणीच्या FM 103.6 येथे तसेच NewsOnAir या अॅपवर हे प्रसारण ऐकता येईल. अलिकडेच सावंतवाडीतील कोमसापच्या साहित्य संमेलनात त्यांच्या 'हे थेंबा' या काव्यसंग्रहाचेही प्रकाशन झाले होते. त्यांचा 'आई' हा कथासंग्रह प्रकाशित आहे.