झोळंबे येथील भजन स्पर्धेत मणेरीचे स्वराभिषेक भजन मंडळ प्रथम !

माटणे येथील श्री सातेरी पूर्वाचारी भजन मंडळ द्वितीय
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 02, 2022 18:25 PM
views 259  views

दोडामार्ग : झोळंबेतील भजनप्रेमी आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने माऊली मंदिर येथे नुकत्याच पार पडलेल्या खुल्या भजन स्पर्धेत दोडामार्ग तालुक्यातील मणेरी गावच्या स्वराभिषेक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. माटणे येथील श्री सातेरी पूर्वाचारी भजन मंडळाने द्वितीय आणि केरी सत्तरी (गोवा) येथील श्री आजोबा कल्चरल असोसिएश भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ म्हणून श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ ( कलंबिस्त ) आणि श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ ( पाडलोस) यांची निवड करण्यात आली.

   या भजन स्पर्धेत उत्कृष्ट कोरस- अभंग महिला भजन मंडळ (कुडाळ), गायक- गीतेश कांबळे (स्वराभिषेक मणेरी) आणि गणेश शिरोडकर (श्री सातेरी (श्री देव रवळनाथ प्रासादिक पाडलोस), झांज - गौरेश नाईक (श्री मुसळेश्वर मळेवाड) यांची,पुरावतारी माटणे), गौळण गायक- हनुमंत गवस (श्री सातेरी पुरावतारी माटणे), हार्मोनियम- समीर नाईक (स्वराभिषेक मणेरी), तबला- जानू शिरवलकर (श्री सातेरी पुरावतारी माटणे), पखवाज - दीपक मेस्त्री तर चोखंदळ श्रोता म्हणून नारायण गवस आणि सिद्धेश झोळंबेकर यांची निवड करण्यात आली.

पंचायत समितीचे माजी सदस्य गणेशप्रसाद गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यावेळी बाबाजी झेंडे, सुखाजी गवस, एन. डी. गवस, झोळंबे सरपंच राजेश गवस, उपसरपंच पांडुरंग गवस, परीक्षक विठठ्ल गवस, नीलेश मेस्त्री, आनंद मोर्ये आदी उपस्थितीत होते. केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी सूत्रसंचालन केले. तर जगदीश गवस यांनी आभार मानले.