
दोडामार्ग : मणेरी येथील मयत उमेश फाले याच्या खुनाच्या उलघड्या नंतर शनिवारी दोडामार्ग पोलिसांनी ओरोस येथील फॉरेन्सिक टीमने आरोपिंना सोबत घेऊन दिवसभर तपास यंत्रणा राबविली मात्र दिवस भरात पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे उमेश फालेच्या मृयदेहाची व्हील्लेवाट कशी लावली असावी दफन करून की धहन करून अशे वेगवेगळ्या प्रकारे तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे दोडामार्ग पोलिसां समोर आता शोध लावणे मोठे आवाहन निर्माण झाले आहे.
मणेरी येथील उमेश फाले याला दोन वर्षा पूर्वी उसप येथील राजाराम गवस, सचिन बांदेकर, अनिकेत नाईक या तिघांनी मिळून त्याचा खून केला होता. याचा दोन वर्षानी पोलिसांनी उलघडा केला व आरोपिंना ताब्यात घेतले. दोडामार्ग गोवा सिमेवरील तिलारीच्या कालव्यावर उमेश ला या तिघांनी मारले होते त्या ठिकाणी आज दोडामार्ग पोलिसांनी तपास केला. त्या ठिकाणी उमेश ला कस मारल हे सर्व नाटक त्या तिघांनी स्पष्ट करून दाखवले त्या नंतर दोडामार्ग पोलीस फॉरेन्सिक टीम सह गोवा बिचोली व म्हापसा या ठिकाणी जाऊन तपास केला. मात्र आजच्या तपासात पोलिसांना काहीही सापडले नाही.
खून करून कालव्यात टाकला दहन केला की दफन केला..?
मणेरी येथील उमेश फाले याचा निर्घृण खून करून त्याला दोडामार्ग गोवा सीमेवरील तिलारीच्या कालव्यात टाकल्याचा प्रकार आरोपीनी सांगितला. जर मृतदेह कालव्यात टाकला तर तो गोवा येथील अस्नोडा येथे लोकांचा निदर्शनास आला पाहिजे होता. मात्र त्या कालव्यात कोणाला काही दिसून आले नाही. मग कालव्यातील मृतदेह गेला तरी कुठे? असा प्रश्न आता उपस्तित होत आहे. मग उमेशला मारून त्यांनी कालव्यात टाकले की जमिनीत दफन केले की दहन करून व्हिलेवाट लावली हे शोधण आता पोलिसांसमोर मोठं आवाहन निर्माण झाल आहे.
दरम्यान, काल उघडकीस आलेल्या मणेरी येथील उमेश फालेच्या खुनाला आता वेगळं वळण लागत आहे. आरोपिंनी सांगितल कालव्यार मारून मृतदेह पाण्यात टाकला. मग पाण्यात टाकलेला मृतदेह कोणालाच दिसला नाही काय? कालव्यात जंगली गवेरेडे जरी पडले तरी नागरिकांना एका दिवसात समजते मग मृतदेह कसा दिसला नाही हा मोठा सवाल उपस्तित होत आहे. तर या खुनाला आता वेगळे वळण लागताना दिसत आहे. दोडामार्ग शहर व इतरत्र आता लोकांमध्ये वेगळी चर्चा सुरु झाली आहे. पाण्यात जर त्याला मारून टाकले असते तर तो दिसला असता. त्याचा काहीच थांग पत्ता नसल्याने त्याचा मृतदेह त्या आरोपिंनी एकतर तरी जमिनीत दफनच केला असावा किंवा दहन केला असावा अशी चर्चा आता शहरात सुरु झाली आहे.