
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट हे आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा उद्या १७ ऑगस्टला राजिनामा देणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत कुडाळ शहरात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आणि आपल्याला पहिल्या टर्म मध्ये कुडाळ शहराचे उपनगराध्यक्ष पद भूषवायचा मान मला मिळाला. याबाबत त्यांनी पक्ष संघटना आणि कुडाळमधील जनतेला धन्यवाद देत हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.
या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की सदर काळात कुडाळ शहरातील विविध विकास कामे करण्याचा आपण व आपल्या सर्व सहकार्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला.कुडाळ मध्ये अद्यावत अग्निशमन बंब,लहान मुलांसाठी गार्डन व प्रत्येक वॉर्ड मध्ये विविध विकास कामे केली.कित्येक वर्षे प्रतिक्षेत असलेला भंगसाळ येथील गणेश घाट काम देखील यावर्षीच चालू होईल यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे.कुडाळ मधील प्रमुख असलेल्या कचरा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले व तो प्रश्न यावर्षी मार्गी देखील लागेल. तसेच अद्यावत मच्छिं मार्केट, भाजी मार्केट उभारण्यात येण्या साठी प्रयत्न चालू आहेत. कुडाळ शहरातील वीज समस्या सोडविण्यासाठी ट्रान्स्फॉर्मर यांची देखील मागणी करण्यात आली.
येणार्या काळात उर्वरित कामे करण्यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांसोबत नेटाने काम करेन. आपण कुडाळ उपनगराध्यक्ष म्हणुन काम करण्याची संधी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे,खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक, अरुण दुधवाडकर,वरुण सरदेसाई,सूरज चव्हाण,प्रविण पाटकर,संजय पडते,अमित पेडणेकर व सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत असल्याचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी म्हटले आहे.